प्रवाशाच्या खिशात सापडलं दोन किलो सोनं

 Mumbai Airport
प्रवाशाच्या खिशात सापडलं दोन किलो सोनं

मुंबई - विमानतळावरून एकाच प्रवाशाकडून तब्बल दोन किलो सोनं पकडल्याने खळबळ उडाली आहे. गोया अहमद सिराज नावाच्या या सौदी अरेबियातील नागरिकाकडून कस्टम विभागाने एक किलोचे दोन सोन्याचे बार आणि 100 ग्रॅम वजनाचं सोन्याचं एक बिस्कीट जप्त केलंय. या सोन्याची किंमत 63 लाख 71 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे हा गोया सौदी अरेबिया एयरलाइन्सच्या ग्राऊंड सर्व्हिसेसमध्ये काम करतो.

गुरुवारी रात्री जेव्हा अहमद सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळावरून मुंबईला उतरला तेव्हा कस्टम विभागाने त्याला ताब्यात घेतलं. त्याने कस्टमला दिलेल्या जबाबात यातील दोन किलो सोन हे त्याचं आणि त्यातील उर्वरित सोनं त्याच्या भावाचं असल्याचं सांगितलं आहे.

Loading Comments