'गुगल पे' वरून रिचार्ज करण पडलं महागात

डिजिटल पेमेंटमुळं आर्थिक व्यवहार जरी सोपे झाले असले, तरी यामुळं फसवणुकीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवई परिसरात पत्नीच्या मोबालवर गुगलपेद्वारे रक्कम पाठवून रिचार्ज करू पाहणाऱ्या एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी ८० हजारांना गंडवल्याची घटना घडली.

'गुगल पे' वरून रिचार्ज करण पडलं महागात
SHARES

डिजिटल पेमेंटमुळं आर्थिक व्यवहार जरी सोपे झाले असले, तरी यामुळं फसवणुकीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवई परिसरात पत्नीच्या मोबालवर गुगल पेद्वारे रक्कम पाठवून रिचार्ज करू पाहणाऱ्या एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी ८० हजारांना गंडवल्याची घटना घडली. या प्रकरणी पवई पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


फोनवरून गंडा

मूळचा झारखंडचा रहिवासी असलेला अनिल यादव अंधेरीतील एका हाॅटेलमध्ये चालक म्हणून नोकरी करतो. यादवनं ६ मार्च रोजी पत्नीला मोबाइलसाठी 'गुगल पे'द्वारे ११९ रुपयांचे रिचार्ज केलं. गुगल पे अॅपला अनिल यानं आपल्या युनियन बँकेतील बचत खाते क्रमांक जोडला होता. रिचार्ज करताच त्याला खात्यामधून ११९ रुपये वजा झाल्याचा संदेश आला. मात्र ते रिचार्जचे पैसे पत्नीपर्यंत पोहोचलेच नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी अनिल याने ‘गुगल पे’च्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. सुरुवातीला फोन व्यस्त आल्यानंतर काही वेळानंतर अनिल याला समोरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने कस्टमर केअर मधून बोलत असल्याचं सांगितलं.

पैसे उकळले

काही तांत्रिक बिघाडामुळे तुम्हाला रिचार्ज झाला नसावा, तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा, असं सांगून या व्यक्तीने अनिल यांना 'गुगल पे'वरून आधी १० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. हे पैसे तुम्हाला परत केले जातील. केवळ नेमका काय बिघाड आहे, हे कळण्यासाठी हे करणं जरुरीचं असल्याचं सांगितलं. अनिलने त्यावर विश्वास ठेवून आधी १० हजार रुपये पाठवले. 'गुगल पे'वर तुमचे पैसे येतच नसल्याचं तसंच इतर वेगवेगळी कारणं सांगून तब्बल ८० हजार रुपये उकळले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी सायनमध्ये एका अभिनेत्रीची ही फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अनिल याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.




हेही वाचा -

प्रवाशांना आता सहज ओळखता येणार बोगस तिकीट तपासनीस

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ हजार ६८५ सराईतांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा