रेझिंग डेच्या निमित्तानं सायबर गुन्ह्यांची माहिती

 Kandivali
रेझिंग डेच्या निमित्तानं सायबर गुन्ह्यांची माहिती
रेझिंग डेच्या निमित्तानं सायबर गुन्ह्यांची माहिती
See all

कांदिवली - समतानगर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस 'रेझिंग डे'च्या निमित्तानं ठाकूर कॉलेजच्या 600 विद्यार्थ्यांना सायबर क्राइमबाबत माहिती दिली. हे गुन्हे कसे घडतात याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकारचे गुन्हे करणारे हुशार असतात. विविध आमीषं दाखवून ते सावज फसवतात. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करायला हवं, याबाबत टिप्स या वेळी देण्यात आल्या.

या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे आणि त्यांचे सहकारी सारंग, पाटील, जगताप तसंच नेत्रा मुळे आदी उपस्थित होते. व्हॉट्स अॅप, फेसबुक ट्विटर यांसारख्या सोशल मीडियामुळे सायबर क्राइमचं प्रमाण वाढत चाललं आहे. नायजेरियन टोळ्यांकडून कशी फसवणूक होते, ऑनलाइन बँकिंगमधील तसंच एटीएमद्वारे होणारी फसवणूक याबाबत या वेळी माहिती देण्यात आली. सोशल मीडिया अकाउंट्सवरच्या प्रोफाइल फोटोंचा वापर गुन्हेगार कसा करतात हे सांगून या मार्गांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय करायला हवं, याबाबत टिप्स देण्यात आल्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा, वेळोवेळी आपला बँक पासवर्ड बदला, मोबाइल आणि लॅपटॉपचे पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. त्यापेक्षा ते लक्षात ठेवा असं सुचवण्यात आलं.

Loading Comments