डी कंपनीची हत्यारं कामाठीपुऱ्यात?

 Byculla
डी कंपनीची हत्यारं कामाठीपुऱ्यात?
डी कंपनीची हत्यारं कामाठीपुऱ्यात?
See all

कामाठीपुरा - सी विभागातील कामाठीपुरा(चोर बाजार) परिसरात एका इसमाकडे एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसं आणि एक लोखंडी चाकू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहादत हुसेन रेहमत हुसेन शेख(69) असं या इसमाचे नाव असून, त्याला जे.जे.पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सापडलेली सर्व काडतुसं ही 0.3 एमएम बोअर बंदुकीची असून ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. कामाठीपुरा हा डी कंपनीचा भाग राहिला आहे. डी कंपनीच्या अनेक हस्तकांचे या ठिकाणी अजूनही वास्तव्य आहे. यामुळे या काडतुसांचे डी कंपनीशी काही कनेक्शन आहे का ? याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रविण फरतरे यांनी दिली.

Loading Comments