सलमान खानला भेटण्यासाठी गाठली मुंबई


सलमान खानला भेटण्यासाठी गाठली मुंबई
SHARES

मुंबईतल्या फिल्मी जीवनाच्या अाकर्षणापोटी अनेक तरुण मुलं घर सोडून मुंबईची वाट धरतात. मात्र, इथं अाल्यावर कुठे जायचं, कायं करायचं याची माहिती नसल्याने त्यांना अापली चूक उमजते.  अशाच वाट चुकलेल्या उत्तर प्रदेशमधील दोन मुलांना दादरच्या आरपीएफ जवानांनी त्यांच्या घरच्यांकडं सूपूर्द केलं आहे.


घरातून पैसे, मोबाइल घेतले

मूळचे उत्तर प्रदेशच्या अलिघरमध्ये राहणारे दिपक रणवीर सिंग गटाव  (१५), आशिष गटाव (१६) हो दोघं सध्या दहावीला आहेत. दोघांनाही चिञपटाची खूप आवड असून ते सलमान खानचे प्रचंड चाहते अाहेत. शाळेला सुट्टी असल्यानं सलमानला भेटण्याचा हट्ट या दोघांनी घरच्यांकडं वारंवार केला. मात्र, त्यांच्या अाई-वडिलांनी याकडं दुर्लक्ष करायचे. त्यामुळं दोघांनी घरी न सांगता मुंबईत येण्याचं ठरवलं.  मुंबईत पहिल्यांदाच येत असल्यानं चुकलो तर मदतीसाठी जवळ पैसे आणि एखादा फोन असावा यासाठी दिपकने भावाचा फोन आणि आशिषने घरातून दोन हजार रुपये घेतले.

हे दोघे नियमित पहाटे ५ वा. व्यायाम शाळेत जायचे. दोघं ८ जून रोजी व्यायाम शाळेत जाण्याच्या बहाण्याने मोबाइल आणि पैसे घेऊन निघाले. घरातल्यांनी माग काढू नये यासाठी त्यांनी मोबाइलमधील सिमकार्ड काढून ठेवलं होतं. मिळेल ती एक्सप्रेस पकडून १० जून रोजी दोघंही दादरला उतरले. तर इकडे मुलं घरी न आल्याने घरातल्यांची शोधाशोध सुरू झाली. दोघांच्या पालकंनी अलिघर पोलिस ठाण्यात दोघे बेपत्ता झाल्याची नोंदही केली.


 आरपीएफची सतर्कता

दादरला उतरल्यानंतर  दोघे फलाट क्रमांक ६ वर पहाटे फिरत होते. यावेळी  गस्तीवर असलेल्या आरपीएफच्या महिला पोलिस वनिता शुक्ला यांनी दोघांना हटकलं.  पोलिसांना पाहून दोघेही घाबरले. वनिता यांनी आरपीएफ चौकीत नेऊन चौकशी केली असता, दोघानी भितीपोटी आपल्याला कुणीतरी गुंगीचं चाॅकलेट देऊन अपहरण केल्याचं सांगितलं. अधिक चौकशीत दोघंही खोटं बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनिता यांनी  दम भरला. त्यावेळी अभिनेता सलमान खानच्या आकर्षणापोटी आपण मुंबईत आल्याची कबूली दिली. त्यानंतर दोघांच्याही पालकांशी संपर्क करून दादर रेल्वे स्थानकावरील आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश मेनन यांनी मुलं सुखरूप असल्याचं कळवलं. सोमवारी मुलांचे वडील मुंबईला आल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी त्यांना ताब्यात दिलं.


अनोळख्या मुंबईत अामची मुलं दुसऱ्या कुणाच्या हाती लागली असती तर अाम्हाला मिळाली नसती. आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे आज आम्हाला आमची मुलं सुखरूप मिळाली. अाम्ही त्यांचे अाभारी अाहोत.  - रणवीर सिंग जटाव, दिपकचे वडील



हेही वाचा -

मेट्रोच्या खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू 

पोलिसांच्या घरफोडीचा प्रयत्न अंगलट



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा