पोलिसांच्या घरफोडीचा प्रयत्न अंगलट

आॅन ड्युटी २४ तास' अशी प्रतिमा असलेले मुंबई पोलिस काळ-वेळेची पर्वा न करता या अट्टल चोरांना त्यांची जागा दाखवून देतात. असाच एक थरारक प्रकार नुकताच काळाचौकीतील पोलिस हेडकाॅर्टरमध्ये घडला. पोलिसांच्या घरात चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी रंगेहात पडकलं. कमल जीत सिंग (२०) असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांच्या घरफोडीचा प्रयत्न अंगलट
SHARES

खाकी वर्दीतला पोलिस बघितला की अनेकांच्या जीवाचा थरकाप होतो. त्यांच्या सावलीलाही उभं राहणं नकोस होतं. पण चोरांमध्येही असे काही महाभाग आहेत, जे थेट पोलिसांशीच पंगा घ्यायला तयार होतात. मात्र 'आॅन ड्युटी २४ तास' अशी प्रतिमा असलेले मुंबई पोलिस काळ-वेळेची पर्वा न करता या अट्टल चोरांना त्यांची जागा दाखवून देतात. असाच एक थरारक प्रकार नुकताच काळाचौकीतील पोलिस हेडकाॅर्टरमध्ये घडला. पोलिसांच्या घरात चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी रंगेहात पडकलं. कमल जीत सिंग (२०) असं या आरोपीचं नाव आहे.


पोलिसांच्या घरांना करायचा टार्गेट

काळाचौकी पोलिस हेडकाॅर्टरमध्ये ७ जून रोजी कमल पहाटे ५ वाजता चोरी करण्यासाठी आला. सुरूवातीला त्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या वसाहतीत पोलिस शिपाई बने यांच्या बंद घराचं कुलूप तोडून ६ तोळे सोनं आणि काही रोख रक्कम चोरली. त्यानंतर कमल पोलिस कर्मचारी वसाहतीच्या तळ मजल्यावर चोरी करण्यासाठी आला.


बाहेरून कडी

चोरी करताना आवाज झाला, तरी पकडण्यासाठी शेजारचे बाहेर येऊ नयेत, म्हणून चोरी करण्यापूर्वी कमल आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावायचा. काळाचौकी पोलिस हेडकार्टरच्या तळमजल्यावर कमलने एका पोलिस शिपायाच्या घराची कडी तोडून आत प्रवेश केला. चोरी करताना झालेला आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलेने दार उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु दाराला बाहेरून कडी असल्याने महिलेला बाहेर येता आलं नाही.फोन करून दिली माहिती

त्यामुळे त्यांनी त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे पोलिस शिपाई यशवंत रासम यांच्या पत्नीला फोन केला. शेजारच्या घरात चोर शिरल्याची माहिती रासम यांना त्यांच्या पत्नीने दिल्यानंतर रासम आहे त्या कपड्यात घराबाहेर आले. रासम यांनी दुसऱ्या मजल्यावर राहणारे पोलिस शिपाई संतोष आडीवडेकर यांना सोबत घेतलं.


अखेर कमल दिसला

परंतु कमलने आधीच घरातून पळ काढला होता. कमलला पाहून परिसरातील कुत्री भूंकू लागल्याने दुसऱ्या मजल्यावर राहणारे रासम यांचे सख्खे भाऊ पोलिस शिपाई विजय रासम यांनाही जाग आली. घराबाहेर झोपलेले विजय यांनी उठून पाहिल्यावर त्यांना निळ्या रंगाचं शर्ट घातलेला कमल इमारतीबाहेर पडताना दिसला.'असा' अाला आरोपी जाळ्यात

संतोष आडीवडेकर आणि यशवंत रासम घाईघाईने विजय यांच्याजवळ आले. इमारतीच्या तळ मजल्यावरील अधिकाऱ्यांच्या खोलीत चोर शिरल्याचं सांगितल्यानंतर हे तिघेही इमारतीच्या खाली उतरले. खोलीचं कुलुप तुटलेेलं होते. घरातील सामान आजूबाजूला पडलेलं होतं. चोर नुकताच बाहेर पडलेला असल्याने त्याचा अंदाज घेऊन तिघांनी चोराचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.


काॅटनग्रीन स्टेशनजवळ पकडला

तिघांनी जवळच असलेल्या काॅटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या दिशेने धाव घेतली. आडीवडेकर आणि यशवंत रासम यांनी स्कायवाॅकवर तर विजय यांनी स्कायवाॅकखाली आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेव्हा आडीवडेकर आणि रासम यांना कमल संशयितरित्या चालताना आढळला. तेव्हा दोघांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. विजय यांनीही कमलला ओळखलं. अंगझडतीत कमलजवळ चोरीचा मुद्देमाल आढळून आला.


बहिणीनेच दिली माहिती

पोलिस चौकशीत कमलने या पूर्वी भायखळा, आर.ए.किडवाई. ना.म.जोशी मार्ग, वडाळा पोलिस वसाहतीत पोलिसांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. काही महिन्यांपूर्वी भायखळा येथील बाॅडीगार्ड पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस शिपाई मोहिते यांच्या घरी कमलने पहिल्यांदा प्रयत्न केला होता. मोहिते यांच्या घरी काही न मिळाल्याने त्याने मोहिते यांची शासकीय पिस्तुल आणि ३० जीवंत काडतुसे चोरली होती.


स्वत:च्या सुटकेसाठी

या चोरीची माहिती कमलची बहिणी गुरूप्रित कौरला होती. गुरूप्रित कौर अंमली पदार्थांची तस्करी करायची. एन्काऊंन्टर स्पेशलिस्ट दया नायक यांनी केलेल्या एका कारवाईत पोलिसांनी कौरला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी कौरने स्वतः च्या सुटकेसाठी आपल्या भावाने पोलिसांची बंदूक चोरल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावेळी कमल पोलिसांच्या जाळ्यात पहिल्यांदा अडकला होता.हेही वाचा-

पोलिसाचीच पिस्तुल चोरली, घरफोड्या करणारे बहिणभाऊ गजाआड

निलंबित पोलिस शिपायानेच चोरली काडतुसेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा