निलंबित पोलिस शिपायानेच चोरली काडतुसे

महेंद्र कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याने आपल्या सहकाऱ्याला आर्थिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवलं होतं. त्या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं कळतं. मात्र महेंद्रने ही काडतुसे का चोरली? हे अद्याप कळू शकलं नाही. पोलिस त्या अनुषंगाने त्याची चौकशी करत असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

निलंबित पोलिस शिपायानेच चोरली काडतुसे
SHARES

वरळी सशस्त्र दलाच्या (एलए-३) ५० जिवंत काडतुसांच्या (राऊंड) चोरीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निलंबित पोलिस शिपाई महेंद्र पाटील याला अटक केली आहे. पाटीलवर या पूर्वीही एक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आलं होतं.


चौकशीत 'यांचा' समावेश

काडतूस चोरी प्रकरणात पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या निर्देशानुसार हवालदार विजय हेर्लेकर, कॉन्स्टेबल संकेत माळी, महेश दुधवडे, राजीव पवार, राहुल कदम चौघा पोलीस शिपाईची प्राथमिक चौकशी सुरू होती.


काय आहे प्रकरण?

वरळीच्या सशस्त्र दलाच्या (एलए-३) येथील शस्त्रसाठा विभागातून १२ डिसेंबर २०१७ रोजी ५० जिवंत काडतूस चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. चार सशस्त्र विभागापैकी एक असलेल्या वरळी येथील मुख्यालयातील स्टोअर रुमजवळ रात्री अकराच्या सुमारास महेंद्र पाटील गेला. त्याठिकाणी रात्रीच्या ड्युटीला असलेले हवालदार हेर्लेकर यांच्यासह पाचही गार्ड झोपलेले होते. त्याने कॉन्स्टेबल माळी याने कमरेला बांधायचा ५० जिवंत काडतुसाचा पट्टा (राऊंड) काढून घेतला. त्याचबरोबर दोन रिकामे चार्ज क्लिप घेवून पसार झाला. थोड्या वेळानंतर कॉन्स्टेबल माळीला जाग आली असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने तातडीने अन्य सहकाऱ्यांना उठवून घडलेला प्रकार वरिष्ठांना कळवला.


स्वत: जमा केली काडतुसे

घटनेचं गांर्भीय समजून सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, ‘एलए’च्या प्रमुख अस्वती दोरजे यांनी वरळी मुख्यालयाला भेट देवून पाहणी केली. चोरीला गेलेल्या काडतुसाचा शोध सुरु असल्याचं समजल्यानंतर पोलिस शिपाई महेंद्र पाटील याने ती रात्री दोनच्या सुमारास दादर पोलीस ठाण्यात नेवून जमा केली.  


का काडतुसे चोरली?

मात्र गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन वरळी पोलिस ठाण्यात कालांतराने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. नंतर हा गुन्हा पुढे अधिक तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. महेंद्र कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याने आपल्या सहकाऱ्याला आर्थिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवलं होतं. त्या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं कळतं. मात्र महेंद्रने ही काडतुसे का चोरली? हे अद्याप कळू शकलं नाही. पोलिस त्या अनुषंगाने त्याची चौकशी करत असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

पोलिसाचीच पिस्तुल चोरली, घरफोड्या करणारे बहिणभाऊ गजाआड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा