SHARE

गोरेगाव येथे मेट्रो 7 च्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. शीतल मिश्रा असं या मृत मुलीचं नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पाय घसरून पडली खड्ड्यात

गोरेगावच्या ऑबेरॉय मॉलजवळ मेट्रोच्या कामासाठी खड्डे खणून ठेवले आहेत. या खड्ड्यात कुणी पडू नये किंवा त्या ठिकाणी कुणाला जाता येऊ नये, म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आलेलं आहे. मात्र या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं होतं. याचदरम्यान वीजभट्टी परिसरात राहणारी शीतल संध्याकाळी अंगणात खेळत होती. त्यानंतर चॉकलेट आणण्यासाठी दुकानावर आली असताना. या खड्ड्याच्या शेजारून जाताना मुलीचा पाय घसरला आणि ती त्या खड्ड्यात पडली. शीतल खड्ड्यात पडल्याचं उशिरा कळल्यानंतर स्थानिकांनी तिला बाहेर काढत तातडीने तिला रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी शीतलला मृत्य घोषित केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या