गँगस्टरच्या मृत्यूचं गूढ कायम


गँगस्टरच्या मृत्यूचं गूढ कायम
SHARES

कांजुरमार्ग - अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीच्या टोळीतील गॅंगस्टर अशोक मांडवे याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र घटनेच्या आदल्या रात्री शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मांडवे नक्की कुठे गेला होता, याचा शोध कांजुरमार्ग पोलीस घेत आहेत.
कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडलेला डॅडी दगडी चाळीत परतल्यानंतर दोन दिवसातच आग्रीपाडा पोलिसांनी दगडीचाळीतील गॅंगस्टर अनिल पिसाळच्या घरातून ११ लाखांची रोकड जप्त करत त्याला अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच गवळी टोळीतील कांजुमार्गमध्ये एकमेव राहिलेला गॅंगस्टर मांडवे हा शुक्रवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मांडवे हा सध्या केबल, नेट, दुकाने असा व्यवसाय करत होता. ना कुणाशी वाद, ना घरामध्ये भांडण असं असताना शिर्डीला जातो असं सांगून गुरूवारी घराबाहेर पडलेला मांडवे शुक्रवारी पहाटे पाच वाजता घरी परतला होता. त्याच्या मृत्यूमागचं कारण अद्याप पोलिसांना न सापडल्यानं मांडवे कोठे होता, कुणाला भेटला या मागचं गूढ अजूनही कायम आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याने कांजुरमार्ग पोलिसांनी अधिक माहीती देण्यास नकार दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा