वृद्ध महिलेला लुटणाऱ्याला अटक

 Dahisar
वृद्ध महिलेला लुटणाऱ्याला अटक
वृद्ध महिलेला लुटणाऱ्याला अटक
See all

दहिसर - एका 90 वर्षाच्या वृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपींना दहिसर पोलिसांनी अटक केलीय. ही महिला दहिसर पूर्वेकडील नवनीत रुग्णालयाच्या जवळ असलेल्या अमी झरना इमारतीत राहणारी आहे. 4 नोव्हेंबरला ही महिला दहिसर पूर्वेकडील मानव कल्याण केंद्राजवळच्या जैन मंदिरात जात होती. तेव्हा आरोपी विनायक पाटीलनं आपण तुमच्या दुकानात काम करत असल्याची बतावणी करत मापासाठी वृद्ध महिलेच्या बोटातली अंगठी काढू लागला. महिलेनं आरडाओरड केल्यानंतर तिथून जात असलेल्या बीट मार्शलनं आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर महिलेच्या तक्रारानंतर दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी विनायक पाटीलला अटक केली.

Loading Comments