दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती

पडसलगीकर यांची २०१६ मध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी दहा वर्ष त्यांनी आयबीमध्ये सेवा बजावली होती. त्यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती
SHARES

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे सहाय्यक म्हणून काम करणार आहेत. पडसलगीकर यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दत्ता पडसलगीकर हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. मुंबईतील कुख्यात गुंड अमर नाईकचा पडसलगीकरांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईतच खात्मा करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्तपदी असताना पडसलगीकरांनी कामाठीपुऱ्यातील कुंटणखान्यातून जवळपास ४५० अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांचे पुनर्वसन केले होते.

पडसलगीकर यांची २०१६ मध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी दहा वर्ष त्यांनी आयबीमध्ये सेवा बजावली होती. त्यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.



हेही वाचा -

नक्षली भागातून आलेला ३ कोटींचा गांजा डीआरआयने पकडला

४ वर्षात १०६ आरोपींचा तुरुंगात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा