४ वर्षात १०६ आरोपींचा तुरुंगात मृत्यू

महाराष्ट्रातील कोठडीतील मृत्यूंमुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र तरीही सरकारकडून कोणतीही ठोस उपाय योजना आखली गेलेली नाही.

४ वर्षात १०६ आरोपींचा तुरुंगात मृत्यू
SHARES

मुंबईच्या वडाळा टी टी पोलिस ठाण्यात हाणामारीच्या अदखलपात्र गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या २६ वर्षीय तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. तरुणाच्या या मृत्यूनंतर परिसरातील वातावरण चिघळले. पोलिसांविरोधात नागरिकांनी एकवटत आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र मुंबईत अशा घटना आता वारंवार होऊ लागल्या आहेत. मागील काही  वर्षांची ‘कस्टडीअल डेथ’ची आकडेवारी पाहता ४ वर्षात १०६ जणांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील कोठडीतील मृत्यूंमुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र तरीही सरकारकडून कोणतीही ठोस उपाय योजना आखली गेलेली नाही. महाराष्ट्रात पोलिस कोठडीत २०१३ ते २०१७  या चार वर्षात १०६ आरोपींचा मृत्यू झाला आहे.  न्यायालयीन कोठडीत सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण हे उत्तर प्रदेश राज्याचे आहे.  महाराष्ट्र पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये तब्बल ३५ जणांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला होता. २०१४ मध्ये २६ ची नोंद होती.

पोलिसांच्या अहवालानुसार १०६ प्रकरणांपैकी ४७ प्रकरणांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तर १४ प्रकरणात तपास अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहे. तर १९ प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.  तर कोठडी मृत्यूत उत्तरप्रदेशचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या खालोखाल बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतही कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे.

या पूर्वीही धारावी, मालवणी, समतानगर, शाहूनगर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आरोपीचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही नागरिकांकडून पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन केल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे वेळीच अशा प्रकरणाकडे सरकारने लक्ष वेधत कोठडीतील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.



हेही वाचा -

नक्षली भागातून आलेला ३ कोटींचा गांजा डीआरआयने पकडला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा