वडाळामध्ये सुनेकडून सासूची हत्या

सून व्यवस्थित संभाळ करत नसल्यामुळे नावावर असलेली खोली साखराबाई यांनी विकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यावेळी वादात राग अनावर झालेल्या सुरेखानं साखराबाईला मारहाण केली.

वडाळामध्ये सुनेकडून सासूची हत्या
SHARES

मुंबईच्या वडाळा परिसरात क्षुल्लक कारणावरून सुनेनं आपल्या सासूची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. साखराबाई गिरे असं या मृत महिलेचं नाव आहे.  या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुरेखा गिरे (३५)  या सुनेला अटक केली आहे.


खोली विकण्यावरून वाद

वडाळाच्या कोरबा मिठागर परिसरातील तांबे नगरमध्ये साखराबाई या त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद व्हायचा. बुधवारी सून व्यवस्थित संभाळ करत नसल्यामुळे नावावर असलेली खोली साखराबाई यांनी विकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यावेळी वादात राग अनावर झालेल्या सुरेखानं साखराबाईला मारहाण केली. या मारहाणीत साखराबाई गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वडाळा पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.हेही वाचा -

फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या डमी आणि खोट्या अकाऊंटवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सुनावणीचं रेकॉर्डिंग होणार नाही
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा