भरदिवसा दीड लाखांची लूट

  Ghatkopar
  भरदिवसा दीड लाखांची लूट
  मुंबई  -  

  दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने भरदिवसा  पळवल्याची घटना गोवंडीच्या पंतनगरमध्ये घडली आहे. पीडित महिलेचे नाव मंदा पाटील असे आहे. याबाबत त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

  पंतनगरमधील गोवंडीच्या पाटील चाळ येथे राहणाऱ्या मंदा पाटील या त्यांच्या मैत्रिणीसोबत रविवारी दुपारी चारच्या सुमारास घाटकोपर येथे रिक्षाने जात होत्या. दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर दुचाकीवरुन आलेल्या दोन लुटारुंनी पाटील यांच्यावर चालत्या रिक्षात झडप घेत त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचा हार आणि अडीच तोळे वजनाची सोनसाखळी असा एकूण 1 लाख 37 हजारांचा ऐवज घेउन पोबारा केला. मंदा पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत रिक्षा थांबवली. मात्र तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.