गावी जाताय? तुमच्या घरात चोरी होऊ शकते!


गावी जाताय? तुमच्या घरात चोरी होऊ शकते!
SHARES

मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण गावाला जातात. याचाच फायदा घेत रविवारी चोरट्यांनी मानखुर्दमध्ये भरदिवसा घर फोडल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये राहणाऱ्या विक्रम पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लाखोंचा माल लांबवला आहे. विक्रम पाटील यांचे कुटुंब गावी गेल्यामुळे विक्रम पाटील हे घरी एकटेच होते. रविवारी संध्याकाळी ते फिरण्यासाठी बाहेर गेले असता घरात कुणीच नसल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि त्यांच्या घराचा दरवाजा तोडत घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा