घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

 Govandi
घरफोडी करणारे चोरटे जेरबंद
Govandi, Mumbai  -  

रात्रीच्या वेळेस घरफोडी करून लाखोंचा माल लंपास करणाऱ्या दोन आरोपींना टिळक नगर पोलिसांनी रविवारी गोवंडी येथून अटक केली आहे. नदीम शेख (22) आणि मुशर्रफ शेख (18) अशी या आरोपींची नावे असून यातील नदीम हा रिक्षाचालक आहे. 

दिवसा रिक्षा चालवून नदीम घरांची रेकी करायचा, त्यानंतर रात्री मुशर्रफ आणि अन्य एका साथीदाराच्या मदतीने घरफोडी करत होता. अशाच प्रकारे या चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय परिसरातील एका इमारतीत घरफोडी केली होती. मात्र या इमारतीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये नदीमचा चेहरा कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. 

दरम्यान हा आरोपी हा रिक्षाचालक असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गोवंडीतील राहत्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे देखील पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments