विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळली पाल

 Chembur
विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळली पाल

चेंबूर - समाज कल्याण विभागाच्या संत एकनाथ या मुलांच्या वसतिगृहात रविवारी जेवणात पाल सापडली. चेंबूरच्या या वसतिगृहात 130 मुलांचे जेवण तयार करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात देखील एका विद्यार्थ्यांच्या जेवणात काचेचे तुकडे आढळून आले होते. वारंवार खडे, झुरळे आणि आता तर चक्क पाल सापडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

या वसतिगृहाच्या मेस कमिटीचे अध्यक्ष सुनील तापटे यांच्याकडे लवकरात लवकर ठेकेदार बदलावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आमच्या वरिष्ठांशी बोलून लवकरचं यावर निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अविनाश देवसटवार यांनी दिली.

Loading Comments