देवनार वाशी खाडीजवळ सापडला मृतदेह

 Govandi
देवनार वाशी खाडीजवळ सापडला मृतदेह

गोवंडी - देवनार डंपिंग ग्राउंडला लागून असलेल्या वाशी खाडीजवळच्या झाडात एका 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी सापडला. शिवाजीनगर पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवलं आहे. मृतदेहाची अजूनही ओळख पटू शकलेली नाही. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मच्छिमार खाडीत मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह सापडला. पोलिसांनी या मृतदेहाचा तपशील मुंबईच्या पोलीस स्टेशनसह नवी मुंबई पोलिसांना देखील पाठवला आहे. त्यानुसार याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

Loading Comments