दिपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश फरार ?

तिला चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र सध्या करिश्माही फरार असून एनसीबीचे अधिकारी तिचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश फरार ?
SHARES

सुशांत सिंह प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’च्या तपासात पुढे आलेल्या माहितीच्या आधारे सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली होती. त्याबरोबरच काही ड्रग पेडलर आणि ट्रॅफिकर यांनाही ‘एनसीबी’ने अटक केली होती. रियाचा ड्रग्जच्या व्यापाराशी संबंध नसल्याचे सांगत तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे मध्यंतरी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यातील तीन वर्षांपूर्वीचे व्हॉट्सअप चॅट उघड झाल्यावर ‘ड्रग्ज कनेक्शन’वरून दीपिका आणि करिश्मा यांना समन बजावून ‘एनसीबी’ने त्यांची चौकशी केली होती. ‘एनसीबी’ने मंगळवारी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले. तसेच तिला चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र सध्या करिश्माही फरार असून एनसीबीचे अधिकारी तिचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘ड्रग्ज कनेक्शन’मध्ये दीपिका आणि करिश्माचे नाव आल्यानंतर ‘एनसीबी’ने समन बजावून दोघींची चौकशी केली होती. करिश्माकडे आतापर्यंत दोन वेळा चौकशी करण्यात आली असून एकदा दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. ‘एनसीबी’ने काही ड्रग पेडलरकडे केलेल्या चौकशीत त्यांनी करिश्मा प्रकाशचे नाव सांगितल्याचे ‘एनसीबी’च्या सूत्रांनी सांगितले. ‘एनसीबी’ने काही दिवसांपूर्वी करिश्माच्या घरावर छापा मारला. यावेळी ती घरी नव्हती. तपास एजन्सीने तिच्या घरातून ड्रग्ज जप्त केले असून चौकशीसाठी तिला समन बजावले असून तिच्या घराच्या दारावर ते चिकटविण्यात आले होते. मात्र समन्स बजावून देखील करिश्मा चौकशीला आली नाही. तसेच तिचा फोनही बंद येत आहे. तिच्या घरी एनसीबीचे अधिकारी गेले असता. त्यांना ती घरात मिळून आली नाही. त्यामुळे करिश्मा सध्या फरार असल्याचे बोलले जाते.

हेही वाचाः- महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

 बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरविणाऱ्या क्वान नावाच्या कंपनीमध्ये करिश्मा काम करते. तर रिया चक्रवर्ती हिची मॅनेजर जया साहा हीदेखील याच कंपनीत काम करत असून ती करिश्माची सीनिअर आहे. ‘ड्रग्ज कनेक्शन’च्या तपासादरम्यान जया साहा हिचे नाव पुढे आले होते. ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’नेही तिच्याकडे अनेकदा चौकशी केली आहे. त्यातून करिश्मा आणि जया यांच्यातील चॅटचा खुलासा झाला आणि प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा