राखी सावंत आणि तिच्या भावा विरोधात गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

राखी सावंत आणि तिच्या भावा विरोधात गुन्हा दाखल
SHARES

अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांच्या विरोधात दिल्लीतील विकासपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट बनवून नृत्य संस्था सुरू करण्याच्या नावाखाली राखीच्या भावानं शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीकडून ६ लाख रुपये घेतले होते.

हा चित्रपट गुरमीत राम रहीमवर बनवण्याविषयी बोलला होता. राखी सावंत या नृत्य संस्थेचे उद्घाटन करणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पण ना तो चित्रपट बनला आणि ना नृत्य संस्था उघडली.

फिर्यादी राकेश सावंत त्याचा मित्रा राकेश खत्री यांच्या माध्यमातून भेटले. राकेश खत्री यांचे कार्यक्रम व्यवस्थापनाचे काम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खटला सन २०१७ सालातील आहे. फिर्यादीनं राकेश सावंत यांना २ हप्त्यांमध्ये ६ लाख रुपये दिले. ज्यामध्ये राकेश सावंत यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ७ लाख रुपये परत देण्याचे आश्वासन दिले होते. पण पैसे परत आले नाहीत. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी आयपीसी ४२०/१२०बी/३४ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिस राखी सावंत यांनाही चौकशीसाठी बोलवू शकतात.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा