अखेर गर्दुल्यांचा अड्डा बंद..

 Mumbai
अखेर गर्दुल्यांचा अड्डा बंद..
अखेर गर्दुल्यांचा अड्डा बंद..
अखेर गर्दुल्यांचा अड्डा बंद..
अखेर गर्दुल्यांचा अड्डा बंद..
See all

भांडुप गाव – शिवाई विद्यामंदिराजवळ पालिकेने ठेवलेला लोखंडी कंटेनर म्हणजे मद्यपीं आणि गर्दुल्यांचा अड्डाच झाला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या कंटेनरचा वापर बंद झाल्यानंतर नशेखोर, मद्यपींनी त्यावर कब्जाच केला. स्थानिकांनी अनेक वेळा याबाबत पोलिसांतही तक्रारीही केल्या. मात्र पालिका आणि पोलिस याकडे कानाडोळा करत होते. अखेर चार वर्षांपासून पालिकेकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आलं. बुधवारपासून पालिकने हा कंटेनर गॅसकटरच्या मदतीने काढून टाकला. बांधकाम विभाग अभियंता बबन जोगदंत यांच्या म्हणण्यानुसार या जागी पालिकेची पक्की चौकी बांधण्यात येणार आहे.

Loading Comments