दोन वर्षांनंतर सराईत आरोपी अटकेत

 Govandi
दोन वर्षांनंतर सराईत आरोपी अटकेत

गोवंडी - लूट, हत्येचा प्रयत्न आणि मारामारी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला मंगळवारी देवनार पोलिसांनी गोवंडी येथून अटक केली. आदिल कुरैशी (30) असे या आरोपीचे नाव असून तो याच परिसरातील राहणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने या परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान मंगळवारी पहाटे हा आरोपी त्याच्या घरी येणार असल्याची माहिती देवनार पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचला होता. आरोपीला याची भनक लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून अखेर त्याला अटक केली.

Loading Comments