पोलिसावर पुन्हा हल्ला

  Mumbai
  पोलिसावर पुन्हा हल्ला
  मुंबई  -  

  एकीकडे मुंबईत पोलिसांना लक्ष्य केल जात असताना आता मुंबईच्या लालबागचा राजा परिसरातला असाच प्रकार उघडकीस आलाय. येथे महिला एपीआयने रहिवाशाला ओळखपत्र विचारल्याने धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत महिला एपीआयच्या हाताला दुखापत झाली आहे. गणेश नगर सोसायटीच्या गेटवर रेखा खजुरे नावाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ड्यूटीवर होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव येथील प्रत्येक रहिवाशाला ओळखपत्र देण्यात आले आहे. यावेळी रहिवाशी सागर रहाटेला महिला एपीआय ने ओळखपत्र विचारले असता त्याने महिलेशी हुज्जत घालत धक्काबुक्कीही केली.

   या प्रकरणी रहाटे विरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात 353, 332 आणि 506 कलमांतर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.