मालाडच्या शार्ट फॉर्मेट कंपनीवर छापा

 Malad
मालाडच्या शार्ट फॉर्मेट कंपनीवर छापा

मालाड - मुंबईत सर्व्हिस टॅक्स हेराफेरीची एक धक्कादायक घटना समोर आलीय. मालाड पूर्वकडील वेस्टर्न एक्स्प्रेस झोन मॉलमध्ये असलेल्या शार्ट फॉर्मेट कंपनीवर डिजी इंटेलिजेंस युनिट या टीमनं छापा मारला. या छाप्यासाठी 22 जणांची टिम दिल्लीहून मुंबईत दाखल झाली होती. शॉर्ट फॉर्मेट कंपनीत चालणाऱ्या करोडो रुपयांच्या सर्व्हिस टॅक्सच्या हेराफेरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. या संपू्र्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. या कंपनीच्या सीईओ नियति शाह यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली. मात्र अजूनही किती करोड रुपयांची हेराफेरी झालीय ते स्पष्ट झालेलं नाही. नियति शाहवर दोन पॅन कार्ड आणि डीन नंबर ठेवल्याचा आरोप आहे.

Loading Comments