पोलिस मोबाइल व्हॅनसाठी फिरवा ११२ क्रमांक

राज्यात पोलिस इर्मजन्सी सर्व्हिसची नवीन यंत्रणा उभी करण्यात येत आहे. यासाठी ११२ नंबर असेल.

पोलिस मोबाइल व्हॅनसाठी फिरवा ११२ क्रमांक
SHARES

राज्यात पोलिस इर्मजन्सी सर्व्हिसची (Police Emergency Service) नवीन यंत्रणा उभी करण्यात येत आहे.  यासाठी ११२ नंबर असेल. नागरिकांनी ११२ नंबरवर संपर्क साधल्यावर पोलिसांची मोबाइल व्हॅन (Mobile van) घटनास्थळी पोहचेल. या नवीन पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस नंबरची माहिती मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी विधानसभेत दिली. 

पोलिसांशी तात्काळ संपर्क करण्यासाठी सध्या १०० नंबर आहे. या नंबरवर फोन करून तक्रार केल्यास पोलिसांकडून तातडीने पावले उचलली जातात. याशिवाय महिलांसंदर्भात १०३ नंबर आहे. राज्यात  पोलिस इर्मजन्सी सर्व्हिसची (Police Emergency Service) नवीन यंत्रणा उभारण्यात येणार असून यासाठी ११२ नंबर असणार आहे.  या सर्व्हिससाठी १५०० वाहने आणि २२०० दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावरील चर्चेला गृहमंत्री देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी उत्तर दिले. राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा राज्यात लागू करण्यात येईल. हा कायदा बनविताना विरोधी पक्षाच्या नेत्यांसह महिला सदस्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात येतील.

गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) म्हणाले की, राज्यातील ११५० पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येकी ६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सद्या मुंबई शहरात ५ हजार सीसीटीव्ही बसविण्यात आलेले असून आणखी ५ हजार सीसीटीव्ही बसविण्यात येतील. पुण्यात सध्या १३०० सीसीटीव्ही बसविले आहेत. आणखी सीसीटीव्ही या शहरात बसविले जाणार आहेत. याचप्रमाणे मुंबईंतील नव्या आणि जुन्या इमारतींच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. 



हेही वाचा -

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा