धुलिवंदनाची वर्गणी नाही दिली म्हणून कानच चावून काढला

ठाण्याच्या गांधीनगर मधील घटना

धुलिवंदनाची वर्गणी नाही दिली म्हणून कानच चावून काढला
SHARES

पालिकेच्या ठेकेदाराने खासगी बस चालकाच्या कानाचा चावा घेऊन चक्क कानच तोडल्याची धक्कादायक घटना गांधीनगर परिसरात घडली आहे. होळी-धुळवडीसाठी बक्षिसी (पोस्त) देण्यास नकार दिल्याने ठेकेदाराने बसचालकाच्या कानाचा चावा घेतला. अरविंद गिरी, असे जखमी चालकाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धुलिवंदना दिवशी रंगाचा बेरंग होऊ नये याबाबत वेळोवेळी पोलिस आवाहन करत असतात. मात्र काही विकृतांमुळे सणाला गालबोट हे लागतचं, ठाण्याच्या गांधीनगरमध्ये देखील धुलिवंदनाच्या दिवशी दररोज गिरीनावाचा आपल्या भागात गाडी उभी करतो. त्यामुळे त्याने उत्सवाला बक्षिसी वर्गणी द्यावी. या वरून वाद झाला. त्यावेळी ठाणे महानगर पालिकेत पाणी पुरवठा ठेकेदारांला पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने चालकाचा कानच चाऊन काढला.  याघटनेची माहिती ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. सोमेश्वर फोफाळ (रा.वागळे इस्टेट, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली.


हेही वाचाः- मुंबईतील ३८ जणांवर वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा