करोडो रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक, दिग्दर्शकाला अटक

२० लाख रुपये आरोपीच्या अॅग्लो फायनान्स कंपनीच्या खात्यात जमा केले. हे पैसे जमा केल्याचे आरोपी अजयला व्यावसायिक फोन करू लागला. मात्र अजय याचा फोन बंद येत होता.

करोडो रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक, दिग्दर्शकाला अटक
SHARES

दिल्लीसह मुंबईतील व्यावसायिकांना करोडो रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अटक केली आहे. अजय रामस्वरूप यादव (५४) असे या आरोपीचे नाव आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात अजय रहात असून त्याने अशा प्रकारे अन्य किती जणांना फसवले आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे. अजयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 


दिल्लीतील येथील एका व्यावसायिकाची साई स्पिरिट प्रा. लि. नावाची कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याला २०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. या भाडंवलीसाठी तो सर्वत्र प्रयत्न करत असताना. त्याची ओळख अजय यादव याच्याशी झाली. त्यावेळी अजयने त्याच्या अॅग्लो फायनान्स कंपनीद्वारे व्यावसायिकाला २०० कोटी रुपये  देण्याचे कंपनीचे ना हरकत पत्र दिले. मात्र प्रायव्हेट फायनान्स प्रोसेससाठी २० लाख रुपये कंपनीच्या बॅक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने आरटीजीएसटीद्वारे २० लाख रुपये आरोपीच्या अॅग्लो फायनान्स कंपनीच्या खात्यात जमा केले. हे पैसे जमा केल्याचे आरोपी अजयला व्यावसायिक फोन  करू लागला. मात्र अजय याचा फोन बंद येत होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने मालाड पोलिसात अजय यादव विरोधात तक्रार नोंदवली. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ११ कडे वर्ग केला. पोलिसांनी अजय यादव अंधेरी लोखंडवाला येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अजय यादवने आतापर्यंत सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले असल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा