दुर्मिळ कासवांची तस्करी करणारे अटकेत

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या स्टार कासवांची तस्करी करण्यासाठी आंध्र प्रदेशहून दोन जण वाशी येथे येणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

दुर्मिळ कासवांची तस्करी करणारे अटकेत
SHARES

आंध्र प्रदेशहून दुर्मिळ स्टार कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) ने अटक केली आहे. कोन्डाला लिंगार्जून (२७), श्रीनाथ लिंगार्जून (२०) अशी या अारोपींची नावे आहेत. या दोघांकडून डीआरआयने दुर्मिळ कासवं भरलेले पाच बाॅक्स हस्तगत केले आहेत. 


वाशी येथे कारवाई

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या या स्टार कासवांची तस्करी करण्यासाठी आंध्र प्रदेशहून दोन जण वाशी येथे येणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कोन्डाला लिंगार्जून अाणि श्रीनाथ लिंगार्जून यांना ताब्यात घेतले.  त्यांच्याजवळून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी स्टार कासव असलेले पाच बाॅक्स जप्त केले आहेत.


जादूटोण्यात वापर 

 या कासवाच्या पाठीवर सोनेरी रंगाची चांदणी बनलेली असते. त्यामुळे काहीजण या कासवांना शुभ मानून आपल्या घरात पाळतात. तर काहीजण या कासवांचा वापर जादूटोण्यातही करतात. त्यामुळे या कासवांना मोठी मागणी असते. खासकरून आंतरराष्ट्रीय बाजारात महागड्या दरांत या कासवांची खरेदी केली जाते.



हेही वाचा - 

#MeeToo च्या संकटात पोलिसांचा दिवाळी 'उमंग'?

अभिनेत्री अक्षरा हसनचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा