#MeeToo च्या संकटात पोलिसांचा दिवाळी 'उमंग'?

गेल्या वेळेस गायक अंकित तिवारी आणि अभिनेता सलमान खान यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही पोलिसांनी त्यांना 'उमंग' या दिवाळी कार्यक्रमाला बोलवल्यामुळे मोठा वांदग निर्माण झाला होता. प्रसार माध्यमांनी पोलिस विभागावर चांगलीच टीका केली होती. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेत अशा वादग्रस्त कलाकारांना वगळूनच कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यास सुरूवात केली आहे.

#MeeToo च्या संकटात पोलिसांचा दिवाळी 'उमंग'?
SHARES

मुंबईकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी दरवर्षी दिवाळी 'उमंग' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई पोलिसांकडून केलं जातं. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री आणि इतर कलाकारांना बोलवलं जातं. परंतु सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या #MeToo चळवळीत सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांची नावे आल्याने 'उमंग' कार्यक्रमासाठी कुणाला बोलवायचं आणि कुणाला बोलवायचं नाही, यावरून मुंबई पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे.


टीकेचा सामना

गेल्या वेळेस गायक अंकित तिवारी आणि अभिनेता सलमान खान यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही पोलिसांनी त्यांना कार्यक्रमाला बोलवल्यामुळे मोठा वांदग निर्माण झाला होता. प्रसार माध्यमांनी पोलिस विभागावर चांगलीच टीका केली होती. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेत अशा वादग्रस्त कलाकारांना वगळूनच कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यास सुरूवात केली आहे.


कलाकारांना मागणी

मागील काही वर्षांपासून हा कार्यक्रम अंधेरी स्पोर्टस संकुल इथं होत आहे. 'उमंग'मध्ये सहभागी होणाऱ्या सिने कलाकारांना पाहण्यासाठी दरवर्षी संकुलात मोठी गर्दी होते. हा कार्यक्रम टीव्ही वाहिनीवर देखील दाखवण्यात येत असल्याने या कार्यक्रमात चांगले कलाकार असावेत याकडे मुंबई पोलिसांचा कल असतो.


'मी टू'चा परिणाम

परंतु सध्या देशात घोंगावत असलेल्या #MeToo चळवळीत काही नामांकीत कलाकारांवर आरोप करण्यात आले आहेत. तर काही कलाकारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे यंदाच्या कार्यक्रमात कुणाला आमंत्रित करायचे आणि कुणाला वगळायचे यासाठी पोलिस प्रशासन डोकं खाजवत आहेत.


मराठी कलाकारांना प्राधान्य

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना निवडण्यात अडचण येत असली, तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस मराठी तारे-तारकांची मदत घेण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यात मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशामुळे नागरिकांमध्ये मराठी कलाकारांबद्दल चांगलंच आकर्षण वाटत आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस व्यूव्हरचना आखत असल्याचं एका बड्या अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटणारे अटकेत

बँकेतल्या भुरट्या चोरांपासून सावधान ! नाहीतर असं होईल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा