भाईंदरमध्ये आगीत होरपळून दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू

 Mumbai
भाईंदरमध्ये आगीत होरपळून दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू

भाईंदर - इथल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ असलेल्या पाच झोपड्यांना मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीत एका दिव्यांग व्यक्तीचा जीव गेलाय. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा या झोपड्यांमध्ये 6 लोक होते. या झोपड्या प्लास्टिक आणि पतऱ्यांच्या असल्याने आगीने रौद्र रुप धारण केलं. तेव्हा तिथे असलेल्या 6 जणांमधील 5 मुलांनी कसेबसे आपले प्राण वाचवले. मात्र 36 वर्षांच्या दिव्यांग कुर्षणा दास यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार उद्यानाजवळ बिल्डरची मोकळी जागा असलेल्या परिसरात 5 मजुरांचे कुटुंब राहात होते. हे सर्व मजूर कामावर गेले असताना सकाळी 10 च्या सुमारास ही आग लागली आणि ती पसरत गेली. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Loading Comments