फेसबुकवर धार्मिक आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या डाॅक्टरला अटक

मागील अनेक दिवसांपासून निशाद हे हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करत आहेत. त्यांच्या अनेक पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साध्वी प्रज्ञा यांना टार्गेट करायचे.

SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साध्वी प्रज्ञाविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉसुनीलकुमार निशाद या डाॅक्टरला पार्कसाईट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. निशाद हा होमिओपॅथी डॉक्टर असून मुंबईतील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.


ब्राह्मणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट 

डॉ. सुनीलकुमार निशाद यांचा विक्रोळीत होमिओपॅथीचा दवाखाना आहे. मागील अनेक दिवसांपासून निशाद हे हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करत आहेत. त्यांच्या अनेक पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साध्वी प्रज्ञा यांना टार्गेट करायचे. मात्र त्यांचा रोष हा सातत्याने ब्राह्मण आणि हिंदू धर्माविरोधात असायचा. वारंवार समजावून देखील निशाद हे आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार याच परिसरातील रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाइट पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.


बामसेफचे सदस्य 

बुधवारी पोलिसांनी डॉ. निशाद याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच निशाद जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज देण्यासाठी जात होता. त्या आधीच पोलिसांनी त्याला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळून अटक केली. डॉ. निशादच्या फेसबुक प्रोफाइलवर ‘बामसेफ’चे सदस्य असल्याचे म्हटले आहे. ‘बामसेफ’ची स्थापना बहुजन समाज पक्षाचे कांशीराम यांनी केली होती.हेही वाचा -

वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहा वर्ष संपली

महाराष्ट्रातील २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या