वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहा वर्ष संपली

२०१० साली पहिल्यांदा या एक मजली पोलिस ठाण्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारत म्हणून नोटीस पाठवली. त्यावेळी बीपीटीने हातवर करत काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्व पोलिस जबाबदार राहतील असे पत्रच पोलिसांना पाठवले.

  • वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहा वर्ष संपली
SHARE

मुंबईच्या ऐतिहासिक पोलिस ठाण्यांमध्ये वडाळा पोलिस ठाण्याची एक वेगळी ओळख आहे. मागील दहावर्षांपासून या पोलिस ठाण्याचा कारबार एका धोकादायक इमारतीतून सुरू होता. लवकरच बिपीटीच्या काँलनीतील एका नव्या इमारतीतून या पोलिस ठाण्याचा कारभार हाताळला जाणार आहे.


काय आहे पोलिस ठाण्याचा इतिहास

वडाळाच्या कोरबा मिठागर परिसरातील बीपीटी काँलनी परिसरात १९६८ साली या पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली. त्या काळी मुंबईत रेल्वेने येणाऱ्या वस्तू या रे रोड परिसरातील गोडाऊनमध्ये उतरवल्या जायच्या, या रेल्वेने येणाऱ्या मुंबईकरांच्या वस्तूवर देखरेख करण्याच्या उद्देशाने हे पोलिस ठाण्याची निर्मीती करण्यात आली होती. आज या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तर त्या अनुशंगाने नवीन पोलिस ठाण्यांची ही निर्मीती करण्यात आली असली. तरी त्या गोदाऊनला जाणाऱ्या रेल्वेच्या पटऱ्यांची जबाबदारी आजही वडाळा पोलिसांकडे आहे.


धोकादायक इमारत

सध्या या पोलिस ठाण्यात १७२ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये १४ पोलिस उपनिरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २ पोलिस निरीक्षक आणि १ वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्यापैकी ३७ महिला कर्मचारी आहेत.  २०१० साली पहिल्यांदा या एक मजली पोलिस ठाण्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारत म्हणून नोटीस पाठवली. त्यावेळी बीपीटीने हातवर करत काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्व पोलिस जबाबदार राहतील असे पत्रच पोलिसांना पाठवले. त्यानंतर २०११ वडाळा पोलिस ठाण्याकडून नवीन पोलिस ठाण्यांसाठी गृहखात्याकडे पत्रव्यवहार सुरू केला. मात्र नवीन पोलिस ठाणे देण्याच्या गोष्टीकडे संबधित सर्वच प्रशासनांनी दुर्लक्ष केले.


पोलिस ठाणे भाडेतत्वावर

सखोल भागात असलेल्या या पोलिस ठाण्यात दरवर्षी मुसळधार पावसात पाणी पोलिस ठाण्यात शिरते. तर जवळच सर्व पेट्रोलिअम कंपन्या असल्यामुळे अवजड वाहनांची पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यांवर कायमच रहदारी सुरू असते. मोठा ट्रेलर पोलिस ठाण्यासमोरून गेल्यास अक्षरशा पोलिस ठाण्याचे खांब हलायचे. या मृत्यूच्या छायेत वावरत असलेल्या वडाळा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून बीपीटीने आता अखेर बीपीटीच्या ३७ नंबरच्या इमारतीत तळमजला आणि पहिला मजला अशा १६ खोल्या २२ महिन्याच्या भाडेतत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार बीपीटीला प्रत्येक महिन्याला ६७ हजार रुपये भाडे पोलिसांना द्यावे लागणार आहे. सध्या पोलिस ठाण्याच्या रंगरंगोटीचे काम सुरू असून आठवड्या भरात पोलिसांना त्या नवीन पोलिस ठाण्याचा ताबा मिळणार आहे. हेही वाचा -

महाराष्ट्रातील १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

विमान तिकिट बुक करण्यासाठी पेमेंट मशीन हॅक, तिघांना अटक

संबंधित विषय
ताज्या बातम्या