महाराष्ट्रातील २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित

SHARE

राज्य सरकारने बुधवारी २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले..गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले.


अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदी असलेल्या देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधीपथकाच्या अपर पोलिस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे. तर मुंबई सह पोलिस आयुक्त (गुन्हे) आशितोष ढुंबरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सध्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुण्याच्या अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागापदी निवड करण्यात आली आहे. तर त्या जागी असलेल्या संजीव सिंघल यांना मुंबईच्या अपर पोलिस महासंचालक, प्रशासन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर डाँ सुखविंदर सिंह यांची मुंबईच्या अपर पोलिस महासंचालक, फोर्स वन, अनुप कुमार सिंह अपर पोलिस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी मुंबई, विनीत अग्रवाल यांची अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी

विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रताप आर दिघावकर - विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध मुंबई, मनोज लोहिया – विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन  महामंडळ, मुंबई, दत्तात्रय मंडलिक – विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, केशव पाटील – विशेष पोलिस महानिरीक्षक, (प्रशिक्षण संचालनालय), मुंबई, पी.व्ही.पांडे – संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे, कुष्ण प्रकाश – विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) मुंबई, संतोष रस्तोगी -  सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मुंबई, राजवर्धन – सह पोलिस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई, अमितेश कुमार सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, दिपक पाण्डेय विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई  

हेही वाचा

दबंग 'लांडें'च्या कारवाईचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला धसका

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या