विमान तिकिट बुक करण्यासाठी पेमेंट मशीन हॅक, तिघांना अटक


विमान तिकिट बुक करण्यासाठी पेमेंट मशीन हॅक, तिघांना अटक
SHARES

कोट्यवधी रुपयांची विमानांची तिकिटे पेमेंट मशिन हॅक करून बुकिंग करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राघवेंद्र रामपाल सिंह(३८), राजप्रताप सिंग मनोहर सिंग परमान(२७) व प्राणसिंह रामसिंह परमान(४८) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा ७ चे पोलिस अधिक तपास करत आहेत.


खाते हॅक

 तक्रारदार यांना डिसेंबर २०१८ महिन्यात गोवाला जायचे होते. त्यामुळे त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीस तात्काळमध्ये विमानाचेे तिकिट बुक करण्यास सांगितलं. तसंच तिकिट बुकिंगसाठी त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी, आणि मोबाइल नंबरही दिला. त्यानुसार तिकिट बुक करणाऱ्यांनी पीएनआर क्रमांकही दिला. त्यानंतर तक्रारदारांनी तिकिटाची माहिती घेतली असता तिकीटावरील मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी तसेच तिकीटाची रक्कम भिन्न असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदाराने चौकशी केली असता तिकिटासाठी तिसऱ्याच व्यक्तीचे बँक खाते हॅक करून पैसे भरल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.


न्यायालयात हजर 

 त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पोलिसांनी  ४६५, ४६७, ४६८,४७१, ४२०,३४ भा.द.वि कलमासह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ४३ (ब), ६६ (क) व ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केेेेला. या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळत तिघांना अटक केली. या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.



हेही वाचा -

दबंग 'लांडें'च्या कारवाईचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला धसका

स्किमरच्या माध्यमातून पैसे चोरणारा नायझेरियन अटकेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा