कुख्यात गुंड परवीन शेखच्या पुतण्याला रेप आणि चोरीच्या गुन्ह्यात अटक

आयपीएल मॅचवर लावण्यात आलेल्या सट्यावर सलमानचे मोठे नुकसान झाले होते. कर्जबाजारी झालेल्या सलमानकडे देणे करऱ्याचे पैसे भागवण्यासाठी पैसे नव्हते.

कुख्यात गुंड परवीन शेखच्या पुतण्याला रेप आणि चोरीच्या गुन्ह्यात अटक
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बांधकाम व्यवसायाची सूत्रे सांभाळणारा कुख्यात डॉन तारिक परवीनच्या पूतण्याला ओशिवरा पोलिसांनी नुकतीच अटक केली. सलमान जुबेर परवीन (२४) असे या आरोपीचे नाव आहे.  एका २४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्याच घरात ६६ लाखांची चोरी केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने सलमानला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः-महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

मुंबई सेंट्रल परिसरात राहणारा सलमान जुबेर कुरेशी याला जुगाराचा प्रचंड नाद होता. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर तो सट्टा लावायचा. २ वर्षापूर्वी त्याची ओळख पीडित महिलेशी झाली होती. त्यावेळी सलमानले आपण वेबसाईट बनवण्याचे काम करत असल्याचे मुलीला सांगितले होते.  पीडित महिलाही ओशिवरा परिसरात तिची बहिण आणि आईसोबत रहात होती. त्यामुळे सलमानचे पीडित मुलीच्या घरी येणे-जाणे होते. याच दरम्यान दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे लग्नाचे आमीष दाखवून सलमानले पीडित महिलेशी शारिरीक संबध ठेवले. त्यावेळी महिलेने तिच्या कमाईतून ६६ लाखांचे मौल्यवान दागिने बनवून ठेवले होते. हे दागिने तिने तिच्या लाँकरमध्ये ठेवले होते. ज्याची माहिती सलमानला होती.

हेही वाचाः- दिवसभरात ५८ पोलिस कोरोनाबाधित, आतापर्यंत २८४ पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

 दरम्यान आयपीएल मॅचवर लावण्यात आलेल्या सट्यावर सलमानचे मोठे नुकसान झाले होते. कर्जबाजारी झालेल्या सलमानकडे देणे करऱ्याचे पैसे भागवण्यासाठी पैसे नव्हते. त्याच दरम्यान म्हणजे ३ आँक्टोंबर ते १० आँक्टोंबर दरम्यान पीडित महिला तिच्या आईसह तिच्या कर्नाटक येथील गावी गेली होती. ही संधी साधून सलमानने पीडित मुलीची बहिण कामानिमित्त घराबाहेर असताना. बनावट चावीने घरातील तिजोरीत चोरी करून, त्या ठिकाणी त्याच  दुसरी तिजोरी आणून ठेवली. तिजोरीतले दागिने त्याने आग्रीपाडा आणि बाँम्बेसेंटर येथील सराफांना विकले. पीडित महिला गाववरून आल्यानंतर तिने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी उघडत नसल्यामुळे तिने ती तिजोरी तोडली. त्यावेळी त्यात ६६ लाखांचे दागिने नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने याची माहिती देण्यासाठी सलमानला फोन केला. मात्र त्याचा फोन बंद येत होता. या प्रकरणी महिलेने आधी ओशिवरा पोलिस ठाण्यात  अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीची तक्रार नोंदवली. मात्र सलमानचा फोन दोन ते तीन दिवस बंद येत असल्याने तिला सलमाननेच ही चोरी केल्याचा संशय आला. तिने त्याच्या मित्राच्या नंबरवर फोन करून सलमानला दागिने परत  करण्याची विनंती केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे देत, लग्नही करणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार मुलीने पून्हा ओशिवरा पोलिसात सलमान विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली.

हेही वाचाः- आतापर्यंत एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पोलिसांनी सलमानवर ३७६(२),३८०,४१७, भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला. मात्र त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. चोरी दरम्यान सलमान त्याच्या जयपूरच्या एका मित्राच्या वारंवार संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. याच दरम्यान सलमानने फोन सुरू करून ‘व्हि चॅट’हून त्याच्या मित्राला काही मेसेज केले. त्यावरून सलमान देखील जयपूरमध्येच असल्याची पोलिसांना खात्री पटली.  त्यावेळी ओशिवरा पोलिसांना सलमानला जयपूर येथून अटक केली. बेंगलोरमध्येही सलमान विरोधात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सलमानहा दुसरा तिसरा कुणी नसून कुख्यात गुंड तारीख परवीनचा पूतण्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने सलमानला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यातील चोरीचा माल हस्तगत केला आहे.

कोण आहे तारीख परवीन

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा बांधकाम व्यावसायाची सूत्र संभाळणारा तारीख परवीन सध्या पोलिस कोठडीत आहे.  १९९८ मध्ये मुंब्रा येथे केबल वॉरमधून झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी तारिकच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर तारिक ऑफिस थाटून त्याच्या कारवाया करत होता. एजाज लकडावालाला व्यापाऱ्यांची माहिती देऊन खंडणी मागायचा. अटकेमुळे दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला मोठा धक्का बसला होता. १९९८ मध्ये मुंब्रा येथे तारिक परवीनने मोहम्मद इब्राहिमसोबत केबल व्यवसाय सुरू केला, मात्र धंद्यातील वैमनस्यातून तारिकने त्याच्या हस्तकांकरवी मोहम्मदवर अंदाधुंद गोळीबार केला. यात मोहम्मद आणि परवेज अन्सारी या दोघांचा मृत्यू झाला तर या गोळीबारात एका लहान मुलीच्या मांडीत गोळी घुसली. या घटनेनंतर तारिक पोलीस यंत्रणांना २० वर्षांपासून गुंगारा देत होता, मात्र त्याने मुंबईच्या जी. टी. हॉस्पिटलजवळ असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी त्याच्या बांधकाम व्यवसायासाठी कार्यालय सुरू केले होते. एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. एजाज लकडावालाला अनेक व्यापाऱ्यांची माहिती देण्याचे काम तो करत होता. याबाबत माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा