Advertisement

आतापर्यंत एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

लॉकडाऊन शिथिल होताच एसटीची सेवा पूर्ववत झाली आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली. उपस्थिती १०० टक्के करण्यात आल्यापासून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

आतापर्यंत एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

लॉकडाऊनच्या (lockdown) काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटीच्या (msrtc) कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २,४८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, ऑक्टोबर महिन्यात १८ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे (coronavirus) मृत्यू झाला असून, महामंडळातील एकूण कोरोनाबळींची संख्या ७९ इतकी झाली आहे. 

लॉकडाऊन शिथिल होताच एसटीची सेवा पूर्ववत झाली आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली. उपस्थिती १०० टक्के करण्यात आल्यापासून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. परिणामी महिन्याभरात ६९३ बाधितांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,४८६ वर पोहोचली आहे.

जून महिन्यात २४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात हळूहळू वाढ होऊन ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांची संख्या १,७९३ वर पोहोचली. त्याचप्रमाणे ६१ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली.

एसटीच्या (msrtc workers) कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ४८६ इतकी झाली असून, ७९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ५५३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून १,८५४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे विभागात सर्वाधिक २०३ कर्मचारी करोनाबाधित झाले असून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच, नाशिक विभागात १८८ कर्मचारी करोनाबाधित आणि ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव व सांगली विभागात प्रत्येकी ७ कर्मचाऱ्यांचा, कोल्हापूर विभागात ६ आणि पुणे विभागात ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा