अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री महागात पडू शकते, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईतल्या एका इसमाला महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यानंतर काही दिवसांनी मैत्री वाढवून या व्यक्तीकडून टप्प्याटप्प्यानं जवळपास चाळीस लाख रुपये उकळले

अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री महागात पडू शकते, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

अनेकदा आपण फेसबुकवर अनेक अनोळखी लोकांच्या संपर्कात येतो काहीजण मैत्री वाढवतात तर काहीजण प्रेमात पडतात मात्र अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी मैत्री करणं किती महाग पडू शकत याचा प्रत्यय देणारी घटना मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलीय.

हेही वाचाः- २४ तासांच्या आत महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश

फेसबुक वर महिला असल्याचे भासवून अनेकांशी मैत्री करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केलेला आहे. डोंगरी पोलिसांनी या टोळीतल्या सात आरोपींना दिल्लीतून अटक केलेली आहे. आरोपींनी मुंबईतल्या एका इसमाला महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यानंतर काही दिवसांनी मैत्री वाढवून या व्यक्तीकडून टप्प्याटप्प्यानं जवळपास चाळीस लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक खुलासा तपासामध्ये झालाय. मुंबईतल्या डोंगरी पोलीस ठाण्यातल्या एका पथकाने या प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा शोधला त्यानुसार एक पथक दिल्लीला रवाना झालं. महिलेच्या नावाने मुंबईतल्या इसमाची फसवणूक करणारे एक टोळी असून यामध्ये सात आरोपीं असल्याचा खुलासा होताच या सातही आरोपींना मुंबई पोलिसांनी सापळा रचून दिल्लीमध्ये अटक केली आणि त्यानंतर ट्रांझिट रिमांड मिळवून  मुंबईमध्ये आणलं आहे.

हेही वाचाः- मुख्यमंत्री बदलला की जागेची मालकी बदलते का?, महापौरांचा सवाल

अटक करण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये नीरज रमेश वर्मा, साबीर सिकंदर, मनमोहन सिंग, चंन्‍द्रपाल नेत्रम शर्मा,आसिफ समसुद्दिन शेख वसीम अहमद खान आणि एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे.. या सात आरोपींनी मिळूनच महिलेच्या नावाने एक फेसबुक अकाउंट काढून मुंबईतल्या इसमाशी फेसबुकवर मैत्री वाढवली आणि त्यानंतर एकत्र व्यवसाय सुरू करू असं सांगून ४० लाख रुपये उकळल्याच तपासामध्ये स्पष्ट झालेल आहे त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी फेसबुकवर मैत्री करणं आणि त्यांच्याशी व्यवहार करणं किती महाग पडू शकत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालय..

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा