Advertisement

महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू होणार, पण...

आता 24 तासांच्या आत महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू होणार, पण...
SHARES

१५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी केंद्रानं परवानगी दिली होती. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स देखील जाहीर केल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात अद्याप चित्रपटगृहे बंद होती.

पण आता 24 तासांच्या आत महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबत 6 नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरू करण्यात येणार आहेत. चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

केंद्र सराकारच्या परवानगीनंतर राज्यातील सिनेमागृह कधी सुरू करणार यांसदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना विचारणा करण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, 'सिनेमागृह सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं विचार करत आहे.

नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी मौसम असतो. त्यामुळे चित्रपगृह सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून लकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे थिएटर मालकांना आणि या व्यवसायाशी जोडले गेलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. दरम्यान अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. आता चित्रपगृहे सुरू होणार असल्यानं थिएटर मालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.


काय आहेत नियम?

  • चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे.
  • चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे.
  • आसनव्यवस्था राखीव ठेवता येणार नाही.
  • प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं.
  • आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा.
  • थर्मल स्क्रिनिंग वापरणं आवश्यक आहे.
  • फक्त लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा.

हेही वाचा

‘अशी’ सुरू होतील देशभरातील सिनेमागृह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा