संशयितांचं भूत, अफवांना ऊत

 Pali Hill
संशयितांचं भूत, अफवांना ऊत

मुंबई - उरणमध्ये दिसलेल्या संशयित दहशतवाद्यांचा सुरक्षा यंत्रणांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मुंबईत मात्र या संशयितांवरून अफवांना ऊत आला आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटी तसेच कुर्ला परिसरात संशयित दहशतवादी दिसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. मात्र दोन्ही ठिकाणी केलेल्या तपासणीत कुठलीही संशयास्पद व्यक्ती आढळली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवारी उरणमध्ये संशयित तरुण दिसल्याचे वृत्त पसरल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा कामास लागल्या आहेत. मुंबई पोलीसही संभाव्य घातपात टाळण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. मात्र त्याचवेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Loading Comments