दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक

दादर पोलिसांनी २०१८ मध्ये त्याला तडीपार म्हणून घोषीत केले होते.

दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक
SHARES

शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडात मागील १० वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांना यश आले आहे. प्रकाश अवसरकर असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात चोरी, पाकीटमारी सारखे १०० गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

अहमदनगर येथील शिर्डी पोलिस ठाण्यांतर्गत झालेल्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी मोक्का गुन्ह्यांतील प्रकाश मागील दहा वर्षापासून फरार होता. २०११ मध्ये त्याने शिर्डी येथील पाप्या शेख टोळीने प्रवीण गोंदकर, रचित पटनी  यांचा खून केला होता. या गुन्ह्यानंतर प्रकाश वारंवार आपली ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान विक्रोळी रेल्वे स्थानकावर प्रवीण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो अहमदनगर येथील हत्याकांडातील आरोपी असल्याची कबूली दिली. ऐवढेच नव्हे तर दादर पोलिसांनी २०१८ मध्ये त्याला तडीपार म्हणून घोषीत केले होते.

त्याच्या चौकशीतून पोलिसांनी रेल्वेत सोनसाखळी, पाकीटमारी करणाऱ्या सराईत आरोपींना ही बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा सीएसटी रेल्वे पोलिसांना दिला आहे. नाशिक कारागृहात असताना त्याची जामीनावर मुक्तता झाली होती. त्यानंतर तो फरार होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा