डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपींची होणार पोलीस चौकशी

तिघींनाही पोलीस कोठडीत पाठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र न्यायालयीन कोठडीमध्येच या तिघींची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपींची होणार पोलीस चौकशी
SHARES

डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. भक्ती मेहर, डॉ अंकिता खंडेलवाल आणि डॉ हेमा अहुजा या तिघींनाही पोलीस कोठडीत पाठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र न्यायालयीन कोठडीमध्येच या तिघींची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिली आहे.  

कोठडीची मागणी

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला असला, तरी अद्याप गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आरोपींची चौकशी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तिन्ही आरोपींच्या  चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही मागणी मान्य झाली नसली, तरी न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाला पुढचे ३ दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोपींची चौकशी करता येणार आहे.

उत्तर देण्याचे आदेश 

डाॅ. पायल  आत्महत्या प्रकरणात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तिघींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघींनाही १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या वकिलांनी तिघींना जामीन मिळावा म्हणून न्यायालयात  जामीन अर्ज सादर केला होता. या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत. 

 


हेही वाचा-

डाॅ. पायल आत्महत्या प्रकरण: सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा