डाॅ. पायल आत्महत्या प्रकरण: सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब


डाॅ. पायल आत्महत्या प्रकरण: सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब
SHARES

डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावर गुन्हे शाखेला उत्तर देण्याचे निर्देश देतानाच  उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली आहे.

या तिघींनाही १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या वकिलांनी तिघींना जामीन मिळावा म्हणून न्यायालयात  जामीन अर्ज सादर केला. या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहे.


पोलिस कोठडीची मागणी

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला असला, तरी अद्याप गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आरोपींची चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना चौकशीसाठी पोलिस कोठडी मिळावी, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य करत गुरुवारी याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.  

डाॅ. पायल  आत्महत्या प्रकरणात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तिघींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 



हेही वाचा-

तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ

पायल तडवी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा