पायल तडवी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे

मुंबईच्या नायर रुग्णालयातील डाॅक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या तिन्ही आरोपींचा ताबा आता गुन्हे शाखा ३ कडे सोपवण्यात येणार आहे.

पायल तडवी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे
SHARES

मुंबईच्या नायर रुग्णालयातील डाॅक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या तिन्ही आरोपींचा ताबा आता गुन्हे शाखा ३ कडे सोपवण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिकणाऱ्या डॉ.पायल तडवी  हिने २२ मे रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५ दिवसांनंतर तिन्ही आरोपींना अटक केली. या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरूवारी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपवला.

त्यामुळे गुरूवारी सकाळीच गुन्हे शाखा ३ चे पोलिस अधिकारी आरोपी आणि कागदपत्रांचा ताबा घेण्यासाठी आग्रीपाडा पोलिस सहआयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते.



हेही वाचा-

डॉ. पायलची आत्महत्याच? मानेवर गळफासाचे व्रण

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा