COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक
SHARES

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या ३ डॉक्टरांपैकी डॉ. भक्ती मेहेर (२६) हिला मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, डॉ. हेमा अहुजा (२८) आणि डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघींनी सातत्यानं केलेली जातीवाचक चेष्टा डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.

सत्र न्यायालयाबाहेर अटक

आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहेरला पोलिसांनी मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर अटक केली. तर डॉ. हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली असून, आग्रीपाडा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. महिलेला रात्री अटक करणं कायदेशीर नसल्यानं डॉ. हेमा अहुजाला अटक करण्याकरीता न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती.

रुग्णालयाबाहेर आंदोलन

डॉ. पायलच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक व्हावी यासाठी पायलच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. त्यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन तिच्या कुटुंबीयांना भेट दिली. तसंच, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं. त्यानंतर, पोलिसांनी डाॅ. भक्ती हिला अटक केली. मात्र, अन्य २ महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार होत्या. परंतु, त्यांनाही अटक करण्यात आली. तिन्ही महिला डॉक्टरांनी कोर्टात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले असून बुधवारी या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटना अत्यंत दुर्दैवी

या जामीन अर्जात 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ‘पायल नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या महिन्यात तिची जबाबदारी टाळत होती. त्यानंतर, तिनं अचानक रुग्णालयात येणं थांबवलं. रुग्णालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता आणि अतिरिक्त ताण, याविषयी तिच्या आईनेच एफआयआरमध्ये नमूद केलं आहे. पायलनं रुग्णालयात येऊन तिला दिलेलं काम पूर्ण करणं अपेक्षित असताना तिनं रुग्णालयात अनुपस्थित राहणं पसंत केलं. त्यामुळं जर पायलला ‘भगौडा’ असं चिडविण्यात आलं तर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असं म्हणता येणार नाही किंवा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही ठरत नाही. पायल अनुसूचित जमातीमधील आहे, याची आम्हाला माहिती नव्हती. त्यामुळं आम्ही निर्दोष आहोत. आम्ही पायलला त्रास दिलेला नाही,’ असं अहुजा आणि खंडेलवाल यांनी जामीन अर्जात म्हटलं आहे.हेही वाचा -

प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन नोंदणीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा