Advertisement

एफवायसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एफवायसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल मंगळवार २८ मे रोजी जाहीर झाला. फेब्रुवारी ते मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

मुंबई विद्यापीठाशी संलग्न

मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यंतील महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया बुधवारी २९ मेपासून सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी

अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणं बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी महाविद्यालयातून माहिती पुस्तक आणि प्रवेश अर्ज घेणं आवश्यक आहे. प्रवेश अर्ज घेण्यासाठी ७ जूनपर्यत, तर ऑनलाइन नोंदणीसाठी १० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

'अशी' करा नोंदणी

  • ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (Mumbai University Pre Admission online Registration 2019-20) यावर क्लिक करा.
  • विद्यार्थ्यांनं दिलेल्या मोबाइल क्रमांकावर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्या आधारे खातं सुरू केल्यावर अर्ज भरता येणार आहे.
  • माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमुहाप्रमाणेच विषय निवडणं बंधनकारक आहे.
  • विद्यार्थी एकावेळी एकापेक्षा आधिक अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांसाठी नोंदणी करू शकणार आहेत.
  • पूर्ण आणि अचूक माहिती भरली गेल्याची खातरजमा करुन भरलेल्या अर्जाची प्रत काढून संबंधित महाविद्यलयात सादर करावी.
  • ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडं स्कॅन केलेलं छायाचित्र आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी असणं आवश्यक आहे.
  • अर्ज भरताना अडचणी आल्यास ०२०-६६८३४८२१ या क्रमांकावर संपर्क करावा.


अर्ज विक्री

  • अर्ज विक्री – २९ मे ते ०७ जून
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया – २९ मे ते १० जून
  • प्रवेश अर्ज महाविद्यालयांत सादर करणे – ७ ते १३ जून (दुपारी १२.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस ) या कालावधीत संस्थांतर्गत प्रवेश आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश होतील.
  • प्रथम गुणवत्ता यादी – १३ जून , सायं ५ वा.
  • कागदपत्रे पडताळणी – १४ जून
  • शुल्क भरणे – १४ ते १७ जून, सायं..३० वा.
  • दुसरी गुणवत्ता यादी -१७ जून, सायं. ५ वा.
  • कागदपत्रे पडताळणी – १८ जून
  • शुल्क भरणे – १८ ते २० जून, सायं. .३० वा.
  • तिसरी (शेवटची) गुणवत्ता यादी – २० जून
  • कागदपत्रे पडताळणी – २१ जून
  • शुल्क भरणे – २१ ते २४ जून, सायं. ५ वा.

हेही वाचा -

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा