Advertisement

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून


विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून
SHARES

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जून पासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३  आठवडे चालणार आहे. असं असलं तरी, अधिवेशनात केवळ १२ दिवसच कामकाज होईल.  

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात १८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. या अर्थसंकल्पावर २१ आणि २४ जून रोजी चर्चा होईल. तर राज्यपालांचं अभिभाषण आणि चर्चा १९ - २० जून रोजी होतील.  

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या संकेतानुसार पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.  



हेही वाचा-

पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर विखेंचा भाजपात प्रवेश?

राहुल गांधींना हरवून फेडला नवस? पायी चालत स्मृती इराणींनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा