Advertisement

राहुल गांधींना हरवून फेडला नवस? पायी चालत स्मृती इराणींनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

लोकसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी इराणी यांनी त्यांची मैत्रीण निर्माती एकता कपूर हिच्यासोबत १४ किलोमीटर पायी चालत मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

राहुल गांधींना हरवून फेडला नवस? पायी चालत स्मृती इराणींनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
SHARES

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीला उद्ध्वस्त करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तिथं भाजपाची विजयी पताका फडकवली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा दणदणीत पराभव करत इराणी जायंट किलर ठरल्या आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी इराणी यांनी त्यांची मैत्रीण निर्माती एकता कपूर हिच्यासोबत १४ किलोमीटर पायी चालत मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. राहुल यांच्यावरील विजयाचा नवस फेडण्यासाठीच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचं म्हटलं जात आहे.

इराणी आणि एकता कपूर या दोघींनी मंगळवारी पायी चालत जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि तिथं सेल्फी काढला. हा सेल्फी दोघींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी १४ किमी पायी चालत गेल्यावर चेहऱ्यावर आलेला टवटवीतपणा' असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. एकतानं इन्स्टाग्रामवर सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे काही व्हिडिओ देखील अपलोड केले आहेत. त्यातील एका व्हिडिओत 'देवाने माझा नवस पूर्ण केला' असं बोलताना इराणी दिसत आहेत. 

या व्हिडिओत इराणी यांनी स्पष्टपणे नवस कशासाठी केला, यावर भाष्य केलेलं नसलं. सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांनी कशासाठी नवस केला असेल, हे स्पष्टच आहे.हेही वाचा-

लोकसभेसाठी शिवसेनेचे खासदार घेणार मराठीतून शपथ

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सनी देओल मुंबईत परतला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा