
देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी झाली असून, महायुतीला बहुमत मिळालं आहे. शिवेसेनेनं महाराष्ट्रातील ४८ जागांमधून १८ जागा जिंकल्या तर, २३ जागा भाजपनं जिंकल्या. या विजयानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार १७ व्या लोकसभेसाठी शपथ घेणार आहेत. मात्र, ही शपथ मराठीमधून घेणार आहेत.
'खासदारांनी शपथ घेण्यासाठी अपल्या आवडीची भाषा निवडली आहे. आम्हाला मराठी भाषा आणि आमच्या मातृभूमीवर गर्व आहे. तसंच, शिवसेनेचा जन्मच मराठी भाषा वाचविण्यासाठी आणि प्राधान्य देण्यासाठी झाला होता. त्यामुळं आम्ही सर्व खासदार मराठीमध्ये शपथ घेणार आहोत', असं कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी रात्री सांगितलं.
१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची सुरूवात ६ जूनला होणार असून १५ जूनपर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जूनला सुरू होणार आहे. तसंच, या सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन आहे. त्याचप्रमाणं, राज्यात विधानसभा होणार असून, शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
हेही वाचा -
'डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार' – गिरीश महाजन
२ जूनला मुंबई म्हाडाच्या घरांची सोडत
