'डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार' – गिरीश महाजन

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांची आणि आंदोलकांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली. त्यावेळी महाजन यांनी 'संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल', असं आश्वासन पायलच्या कुटुंबियांना दिलं.

'डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार' – गिरीश महाजन
SHARES

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवीनं रॅंगिंगमुळं आत्महत्या केलेल्या पायलच्या कुटुंबियांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांची आणि आंदोलकांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली. त्यावेळी महाजन यांनी 'संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल', असं आश्वासन पायलच्या कुटुंबियांना दिलं.


'कुणीही सुटणार नाही'

'पायलच्या कुटुंबीयांचं जे काही म्हणणं रास्त आहे. त्या दृष्टीनं संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही सुटणार नाही, कुणालाही माफी नाही, ज्यांनी चूक केलीय, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल', असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. रॅगिंग कायद्यात काही सुधारणा करता येईल का, याबाबतची विवेचन सुरु आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही महाजन यांनी म्हटलं.


'जन्मठेपेची शिक्षा द्या'

डॉ. पायलच्या आत्महत्येमुळं तिच्या कुटुंबियांनी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी तिच्या कुटुंबियांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याशिवाय, 'माझ्या मुलीचा जीव नायर हॉस्पिटल परत आणू शकणार आहे का, असा सवाल पायलच्या आईनं केला. ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, आरोपी मुलींची डीग्री रद्द करावी', अशी मागणी पायलच्या आईनं केली.


कारवाई केलेली नाही

'माझ्या मुलीला न्याय मिळावा. ज्या मुलींनी तिचा छळ केला, त्यांना अटक करुन त्यांची नोंदणी रद्द करावी, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या. त्याशिवाय येथून हलणार नाही. पोलिसांनी ७ दिवस झाले, काहीही कारवाई केलेली नाही किंवा संपर्क साधला नाही, असंही पायलच्या आईनं म्हटलं.


जातीवाचक चेष्टा 

नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीनं २२ मे रोजी आत्महत्या केली. गेले अनेक दिवस पायलचे सहकारी तिची जातीवाचक चेष्टा करत होते. त्यामुळं दररोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून पायलनं हॉस्टेलमधील खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.



हेही वाचा -

‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के

छाया कदमची स्वप्नपूर्ती



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा