‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. अभिनयाचं करिअर सांभाळून तारेवरची कसरत करत बारावीची परीक्षा देणाऱ्या रिंकूचं हे मोठं यश म्हणावं लागेल.

  • ‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के
SHARE

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. अभिनयाचं करिअर सांभाळून तारेवरची कसरत करत बारावीची परीक्षा देणाऱ्या रिंकूचं हे मोठं यश म्हणावं लागेल. कारण ती बहिःस्थ विद्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा देत होती. 

इंग्रजी जरा कच्चाच

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदा राज्यात ८५.८८ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. त्यात रिंकूचाही समावेश आहे. रिंकूला एकूण ५३३ गुण मिळाले आहेत. त्यापैकी मराठीत ८६, इंग्रजीत ५४, इतिहासमध्ये ८६, भूगोलमध्ये ९८, राज्यशास्त्रमध्ये ८३, अर्थशास्त्रात ७७ तर पर्यावरणमध्ये ४९ इतके गुण मिळाले आहेत. मराठीत सांगितलेलं कळत नाय? इंग्रजीत सांगू? असा डायलाॅग मारणाऱ्या रिंकूचा इंग्रजी विषय वास्तवात मात्र इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच जरा कच्चा असलेला दिसतआहे.


परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त

रिंकूनं बारावीची परीक्षा टेंभूर्णीतील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून दिली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊन परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता लक्षात घेत पोलिस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली होती. याआधी रिंकूने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला केंद्रातून दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ती ६६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली होती.

 


हेही वाचा-

Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलीच अव्वलसंबंधित विषय
ताज्या बातम्या